मराठी विभागाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची जाण अधिक मजबूत करणे आहे. पारंपरिक ते आधुनिक अशा विविध साहित्यप्रकारांचा अभ्यास करून विद्यार्थी भाषेची समृद्ध परंपरा समजू शकतात. वाचन, लेखन आणि चिंतनशक्ती विकसित करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
वर्गातील अध्यापनाबरोबरच विभागात कार्यशाळा, अतिथी व्याख्याने, कविता वाचन, सांस्कृतिक उपक्रम आणि संशोधनाधारित उपक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना भाषेचा व्यावहारिक आणि सांस्कृतिक संदर्भ अधिक चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळतो.
विभागात अनुभवी आणि विद्यार्थी-केंद्रित प्राध्यापक कार्यरत आहेत. साहित्य, भाषाशास्त्र, सर्जनशील लेखन आणि संवाद कौशल्ये या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यावसायिक क्षमता वाढवणे हे विभागाचे प्रमुख लक्ष्य आहे.
मराठी ही केवळ एक भाषा नसून समाज, मूल्ये आणि ओळख समजून घेण्याचे माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठीचे संवर्धन करावे आणि ती विविध क्षेत्रांत अर्थपूर्णपणे वापरावी, हा विभागाचा प्रयत्न आहे.
POs: PROGRAMME EDUCATIONAL OBJECTIVES
पदवी अभ्यासक्रमाची उद्दिष्टे
PROGRAMME: B.A. (Bachelor of Arts) Pattern – 2024
| PO 1 | मराठी भाषा, साहित्य आणि त्यांच्या इतिहासाचे ज्ञान देणे. विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन आणि जीवनविषयक जाणिवा समृद्ध करणे. |
| PO 2 | मराठीतील साहित्यविचाराचे ज्ञान देणे. |
| PO 3 | मराठी समीक्षा व्यवहाराचे ज्ञान देणे. |
| PO 4 | विद्यार्थ्यांमध्ये प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भाषिक कौशल्य विकासाची जाणीव-जागृती घडवून आणणे आणि त्यांच्यात मराठीतील भाषिक कौशल्यांचा विकास करणे. |
| PO 5 | विद्यार्थ्यांमध्ये प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मराठी भाषेतील रोजगाराची कौशल्ये आणि क्षमता विकसित करणे. |
| PO 6 | मराठीतील विविध साहित्यप्रकारांचा परिचय करून देणे. |
| PO 7 | साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात घेऊन साहित्याचे आकलन करून घेणे. |
| PO 8 | साहित्यकृतींच्या चिकित्सक अभ्यासाची प्रवृत्ती वृद्धिंगत करणे. |
| PO 9 | भारतीय ज्ञानपरंपरेची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे. |
| PO 10 | विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधून त्याला सुसंस्कारित नागरिक म्हणून सिद्ध होण्यास मदत करणे. |
POs: PROGRAMME OUTCOMES
पदवी अभ्यासक्रमाची अध्ययननिष्पत्ती
PROGRAMME: B.A. (Bachelor of Arts) –Pattern : 2019
| Sr.No. | Program Outcomes |
| PO 1 | मराठी भाषा आणि साहित्यातील पायाभूत सैद्धांतिक घटकांचे आकलन होईल. |
| PO 2 | विविध दृष्टीकोनातून स्पष्टतापूर्ण वाचन आणि अभिव्यक्ती करता येईल. |
| PO 3 | चिकित्सक विचार करण्याची कौशल्ये आत्मसात होतील. |
| PO 4 | भाषिक समस्यांचा शोध घेऊन योग्य ते उपाय शोधण्याचा प्रयत्न करू शकेल. |
| PO 5 | प्राप्त माहितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण आणि कारणमीमांसा करता येईल. |
| PO 6 | संशोधनवृत्ती निर्माण होईल. |
| PO 7 | सामुहिक ध्येयप्राप्तीसाठी एकत्र येऊन काम करणे. |
| PO 8 | तार्किकदृष्ट्या प्राप्त माहितीचे परीक्षण करेल. |
| PO 9 | वैचारिक प्रगल्भता विकसित होईल. |
| PO 10 | वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या कृती स्वतंत्रपणे करता येतील. |
| PO 11 | सहजपणे दृक्श्राव्य माध्यमांची हाताळणी करता येईल. |
| PO 12 | विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जाण विकसित होऊन सामाजिक सामंजस्य निर्माण होईल. |
| PO 13 | सर्वांचा आदर करणे आणि विश्वबंधुत्वाची भावना विकसित होण्यास मदत होईल. |
| PO 14 | अनेकविध क्षेत्रांत नेतृत्व करण्याची कौशल्ये आत्मसात होतील. |
| PO 15 | सतत अध्ययन व संशोधन करण्याची शाश्वत आवड निर्माण होईल. |
POs: PROGRAMME EDUCATIONAL OBJECTIVES
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची उद्दिष्टे
PROGRAMME: M.A. (Master of Arts) – 2023 Pattern
| PO 1 | पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन आणि जीवनविषयक जाणीवा समृद्ध करणे. |
| PO 2 | विशिष्ट कालखंडातील साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात घेऊन साहित्याचे आकलन करून घेणे. |
| PO 3 | वाङ्मयीन परंपरेची जाणीव करून देणे. |
| PO 4 | विविध भाषाभ्यासाच्या पद्धतींची ओळख करून देणे. |
| PO 5 | मुलभूत साहित्यसिद्धांतांचा परिचय करून देणे. |
| PO 6 | विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये विकासाची जाणीव-जागृती घडवून आणणे. |
| PO 7 | साहित्यकृतींच्या चिकित्सक अभ्यासाची प्रवृत्ती वृद्धिंगत करणे. |
| PO 8 | विविध समीक्षापद्धतींची ओळख करून देणे. |
| PO 9 | विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराच्या क्षमता विकसित करणे. |
| PO 10 | अभ्यासकाचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कारित करणे. |
POs: PROGRAMME OUTCOMES
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची अध्ययननिष्पत्ती
PROGRAMME: M.A. (Master of Arts) – 2024 Pattern
| Sr.No. | Program Outcomes |
| PO 1 | पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन आणि जीवनविषयक जाणीवा समृद्ध होतील. |
| PO 2 | साहित्यकृतींच्या चिकित्सक अभ्यासाची प्रवृत्ती वृद्धिंगत होईल. |
| PO 3 | भाषिक जाणीवा विकसित करून कौशल्यात्मक उपयोजनासाठी सिद्ध होतील. |
| PO 4 | विविध जीवनक्षेत्रातील भाषाविषयक कौशल्य ग्रहणानंतर रोजगारक्षमतांची आणि प्राविण्यांची निर्मिती होईल. |
| PO 5 | विशिष्ट कालखंडातील साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात घेऊन साहित्याचे नेमके आकलन करून घेता येईल. |
| PO 6 | तौलनिक अभ्यास, भाषांतर मीमांसा, प्रभाव अभ्यास, आंतरविद्याशाखीय दृष्टी, परभाषेतील समकालीन साहित्यकृती, वाङ्मयेतिहास, संस्कृती अभ्यास, भाषिक अभ्यास याद्वारे साहित्याच्या अभ्यासाला परिपूर्णता आणता येईल. |
| PO 7 | पौर्वात्य व पाश्चात्य साहित्यविचार, साहित्यसिद्धांत, समीक्षा, साहित्यविमर्श, विविध वाङ्मयीन संप्रदाय, वेळोवेळी उद्भवणाऱ्या जीवनविषयक व वाङ्मयीन चर्चा, संकल्पना यांचा पैस विद्यार्थ्यांना परिचित होईल. |
| PO 8 | संशोधनाची निरनिराळी अंगे तसेच संशोधनाच्या विविध पद्धतींची ओळख होईल. |
PSOs: PROGRAMME SPECIFIC OUTCOMES
पदवी अभ्यासक्रमाची विशेष निष्पत्ती
PROGRAMME: B.A. (Bachelor of Arts) – Pattern – 2024
| Sr.No. | Program Specific Outcomes |
| PSO 1 | साहित्यविषयक विविध संकल्पना आणि साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांचे आकलन होईल. |
| PSO 2 | भाषिक कौशल्ये आत्मसात होतील आणि तंत्रज्ञानाचा भाषिक व्यवहारात कौशल्यपूर्ण वापर करता येईल. |
| PSO 3 | मराठी भाषा आणि साहित्यविषयक संशोधनवृत्ती निर्माण होईल. |
| PSO 4 | व्यक्तिमत्व विकासास चालना मिळून जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण होण्यास मदत होईल. |
PSOs: PROGRAMME SPECIFIC OUTCOMES
पदवी अभ्यासक्रमाची विशेष निष्पत्ती
PROGRAMME: B.A. (Bachelor of Arts) – Pattern – 2019
| Sr.No. | Program Specific Outcomes |
| PSO 1 | साहित्यविषयक विविध संकल्पना आणि साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांचे आकलन होईल. |
| PSO 2 | भाषिक कौशल्ये आत्मसात होतील आणि तंत्रज्ञानाचा भाषिक कौशल्यपूर्ण वापर करता येईल. |
| PSO 3 | मराठी भाषा आणि साहित्यविषयक संशोधनवृत्ती निर्माण होईल. |
| PSO 4 | व्यक्तिमत्व विकासास चालना मिळून जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण होण्यास मदत होईल. |
PSOs: PROGRAMME SPECIFIC OUTCOMES
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विशेष निष्पत्ती
PROGRAMME: M.A. (Master of Arts) – Pattern : 2023
| Sr.No. | Program Specific Outcomes |
| PSO 1 | वाङ्मयीन मूल्यांचे आणि जीवनमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास मदत होईल. |
| PSO 2 | वाचन, आस्वादन, विश्लेषण, वर्गीकरण, मूल्यनिर्णयन या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची वाङ्मय आकलनाची क्षमता वृद्धिंगत होईल. |
| PSO 3 | साहित्य आणि संस्कृती यांचा परस्पराश्रयी संबंध जागतिक परिप्रेक्षात लक्षात घेण्यासाठी क्षमता व कौशल्ये निर्माण होतील. |
| PSO 4 | मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या अनुबंधाचा शोध घेता येईल. |
PSOs: PROGRAMME SPECIFIC OUTCOMES
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विशेष निष्पत्ती
PROGRAMME: M.A. (Master of Arts) – Pattern : 2024
| Sr.No. | Program Specific Outcomes |
| PSO 1 | वाङ्मयीन मूल्यांचे आणि जीवनमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास मदत होईल. |
| PSO 2 | वाचन, आस्वादन, विश्लेषण, वर्गीकरण, मूल्यनिर्णयन या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची वाङ्मय आकलनाची क्षमता वृद्धिंगत होईल. |
| PSO 3 | साहित्य आणि संस्कृती यांचा परस्पराश्रयी संबंध जागतिक परिप्रेक्षात लक्षात घेण्यासाठी क्षमता व कौशल्ये निर्माण होतील. |
| PSO 4 | मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या अनुबंधाचा शोध घेता येईल. |
COs: COURSE OUTCOMES
अभ्यासपत्रिकेची अध्ययन निष्पत्ती
PROGRAMME: B.A. (Bachelor of Arts) – Pattern 2024
| Sr. No. | Class | Sem | Subject with Code | Course Outcomes |
| F.Y.B.A | I | DSC: MAR-101-T साहित्याचे स्वरूप (निवेदनात्म साहित्यप्रकार)
अभ्यासपुस्तक : मन में है विश्वास (लेखक – विश्वास नांगरे पाटील) |
· साहित्याचे स्वरूप आणि साहित्यप्रकारांची संकल्पना ज्ञात होईल.
· आत्मकथन या साहित्यप्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, वैशिष्ट्ये आणि मराठी आत्मकथनांची वाटचाल यांचे ज्ञान विद्यार्थी आत्मसात करतील. · आत्मकथनांच्या अभ्यासातून साहित्याचा आस्वाद घेण्याची प्रेरणा मिळेल. · आत्मकथन या साहित्यप्रकाराच्या संदर्भात विद्यार्थ्यांची आकलन आणि विश्लेषणक्षमता विकसित होईल. · आत्मकथन वाचन, आस्वादन, विश्लेषण, वर्गीकरण, मूल्यनिर्णयन या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची साहित्यविषयक अभ्यासाची समज विकसित होईल. · आत्मकथनाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना अनुभवमांडणीची कला अवगत होईल. त्याचप्रमाणे अनुभवविश्लेषणाची प्रेरणा मिळेल. |
|
| F.Y.B.A | I | DSC: MAR-102-P साहित्यप्रकारांचे सादरीकरण [2P] | · साहित्यप्रकारांची आवाहनक्षमता ज्ञात होईल.
· साहित्यप्रकारांचे वाचन करण्याचे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करतील. · साहित्यप्रकारांचे कौशल्यपूर्ण वाचन करू शकतील. · साहित्यप्रकारांचे वाचन आणि सादरीकरण करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची आकलन आणि विश्लेषणक्षमता विकसित होईल. · काव्यवाचन, कथाकथन, कादंबरीचे अभिवाचन, चरित्रकथन, आत्मनिवेदन इत्यादींचे सादरीकरण करताना साहित्यप्रकारनिहाय मूल्यमापन करता येईल. · काव्यवाचन, कथाकथन, कादंबरीचे अभिवाचन, चरित्रकथन, आत्मनिवेदन इत्यादींचे सादरीकरण करण्याचे कौशल्य अवगत होईल. त्यानुसार विद्यार्थी साहित्यप्रकारांचे सादरीकरण करू शकतील. |
|
| 3. | F.Y.B.A. | Sem II | DSC: MAR-151-T साहित्याचे स्वरूप (काव्यात्म साहित्यप्रकार) [2T]
अभ्यासपुस्तक : गीतमाला (संपादित गीतसंग्रह) |
· काव्यात्म साहित्यप्रकाराचे स्वरूप आणि साहित्यप्रकाराची संकल्पना यांचा परिचय होईल.
· ‘गीत’ या साहित्यप्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, वैशिष्ट्ये आणि मराठी गीतांची वाटचाल यांचे ज्ञान विद्यार्थी आत्मसात करतील. · गीतांच्या अभ्यासातून साहित्याचा आस्वाद घेण्याची प्रेरणा मिळेल. · ‘गीत’ या साहित्य प्रकाराच्या संदर्भात विद्यार्थ्यांची आकलन आणि विश्लेषणक्षमता विकसित होईल. · गीतांचे वाचन, गायन, आस्वाद, विश्लेषण, वर्गीकरण, मूल्यनिर्णयन या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची काव्यविषयक अभ्यासाची समज विकसित होईल. · गीतांच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना काव्यनिर्मितीची आणि विश्लेषणाची प्रेरणा मिळेल. स्व-रचित कविता-गीतांची निर्मिती करता येईल. |
| 4. | F.Y.B.A. | Sem II | DSC: MAR-152-P साहित्यप्रकारांचे लेखन / अवलोकन [2P] | · साहित्य आणि सर्जन यांचे स्वरूप आणि साहित्यलेखनाची कौशल्ये ज्ञात होतील.
· साहित्य प्रकारांचे लेखन करण्याच्या कौशल्यांचे आकलन होईल. · साहित्यप्रकारांच्या रूपबंधांची वैशिष्ट्ये सांगू शकतील. · साहित्यप्रकारांचे सर्जनशील आणि अवलोकनपर लेखन करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि विश्लेषणक्षमता विकसित होईल. · साहित्यप्रकारांचे सर्जनशील आणि अवलोकनपर लेखन करताना साहित्यप्रकारनिहाय रूपबंधाचे मूल्यमापन करता येईल. · विद्यार्थी साहित्यप्रकारांचे सर्जनशील आणि अवलोकनपर लेखन करू शकतील. |
| 5. | F.Y.B.A. | Sem I | SEC : 101-MAR-T उपयोजित मराठी लेखनकौशल्ये [2T] | · मराठी भाषेच्या विनिमयाच्या विविध रूपांचा परिचय होईल.
· जीवनव्यवहारातील भाषेच्या उपयोजनाच्या कौशल्यांची जाण प्राप्त होईल. · कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कार्यक्रमाचे अहवाललेखन, वर्णनपर लेखन, व्यक्तिप्रतिमा निर्मितीपर लेखन अशा स्वरूपाचे लेखन करता येईल. · भाषेच्या विनिमयाच्या विविध रूपांचे विश्लेषण करता येईल. · कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कार्यक्रमाचे अहवाललेखन, वर्णनपर लेखन, व्यक्तिप्रतिमा निर्मितीपर लेखन यांचे मूल्यमापन करता येईल. · भाषिक कौशल्यांच्या उपयोजनांची हातोटी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा सर्जनशील व नाविन्यपूर्ण लेखनतंत्रासह व्यावसायिक वापर करता येईल. |
| 6. | F.Y.B.A. | Sem II | SEC : 151-MAR-P व्यावसायिक मराठी लेखनकौशल्ये [2P] | · मराठी भाषेच्या विनिमयाच्या विविध रूपांचा परिचय होईल.
· जीवनव्यवहारातील भाषेच्या उपयोजनाच्या कौशल्यांची जाण प्राप्त होईल. · बातमी लेखन, भाषण संहिता लेखन, संवाद लेखन/ मुलाखत लेखन, अर्ज व पत्रलेखन अशा स्वरूपाचे लेखन करता येईल. · भाषेच्या विनिमयाच्या विविध रूपांचे विश्लेषण करता येईल. · बातमी लेखन, भाषण संहिता लेखन, संवाद लेखन/ मुलाखत लेखन, अर्ज व पत्रलेखन या लेखनरूपांचे मूल्यमापन करता येईल. · भाषिक कौशल्यांच्या उपयोजनांची हातोटी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा सर्जनशील व नाविन्यपूर्ण लेखनतंत्रासह व्यावसायिक वापर करता येईल. |
| 7. | F.Y.B.Com./B.Sc./B.C.S. | Sem
I |
Open Elective [OE]
OE-H-101-MAR-T व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा [2T] |
· व्यक्तिमत्त्व संकल्पना व तिचे स्वरूप यांचे ज्ञान अवगत होईल.
· व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील स्थान आणि महत्त्व स्पष्ट करता येईल. · जीवनव्यवहारात भाषिक कौशल्यांचा प्रभावी वापर करता येईल. · व्यक्तिमत्त्व विकासातील भाषेच्या उपयोजनाचे विश्लेषण करता येईल. · व्यक्तिमत्त्व विकासातील भाषेच्या उपयोजनाचे मूल्यमापन करता येईल. · व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यास विद्यार्थी प्रवृत्त होतील. |
| 8. | F.Y.B.Com./B.Sc./B.C.S. | Sem
II |
Open Elective [OE]
OEP-H-151-MAR-P व्यावहारिक मराठी [2T] |
· मराठीच्या विविध व्यवहारक्षेत्रांचा परिचय होईल.
· निबंधलेखन, अर्जलेखन व पत्रलेखन यांच्या स्वरूपाचे आकलन होईल. · निबंधलेखन, अर्जलेखन व पत्रलेखनाचे समाजव्यवहारात उपयोजन करता येईल. · व्यवहार भाषेच्या वेगळेपणाचे विश्लेषण करता येईल. · व्यावहारिक गरजेनुसार भाषाबदल करता येईल. · व्यावहारिक गरजांसाठी आवश्यक असणाऱ्या लेखनशैलीचा वापर करून कौशल्यपूर्ण लेखन करता येईल. |
2019 Pattern ( CBCS )
| 9. | SYBA | III | भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : कांदबरी
23023 – G2 |
· कांदबरी या साहित्य प्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल यांची ओळख करून देणे. |
| · नेमेलेल्या कांदबरीचा आस्वाद घेऊन आकलन करणे. | ||||
| · नवतंत्रज्ञानाचा अभ्यास करणे. | ||||
| · प्रभाकर पेंढारकर लिखित ‘रारंगढांग’ या कादंबरीचे विश्लेषण, मूल्यमापन करणे. | ||||
| 10. | SYBA | III | आधुनिक मराठी साहित्यः प्रकाशवाटा 23021 – S1 | · मराठीतील आत्मचरित्र या संकल्पनेची ओळख करून देणे. |
| · साहित्यकृतीचे आस्वाद व आकलन करण्याची दृष्टी निर्माण करणे. | ||||
| · ललितगद्य साहित्य प्रकाराचा अभ्यास करणे. | ||||
| · मराठी भाषिक संज्ञापन कौशल्यांचे व्यवहारिक जीवनात उपयोजन करणे. | ||||
| 11. | SYBA | III | साहित्यविचार
23022 – S2 |
· भारतीय आणि पाश्चात्य साहित्याच्या आधारे साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजन विचार समजून देणे. साहित्याची निर्मिती प्रक्रिया समजावून देणे. |
| · साहित्याची निर्मिती प्रक्रिया समजावून देणे. | ||||
| · साहित्याची भाषा आणि शैली विषयक विचार समजावून देणे. | ||||
| · साहित्य व समाज यांचा सहसंबंध तपासणे. | ||||
| 12. | SYBA | III | प्रकाशन व्यवहार आणि संपादन
23025 SEC |
· प्रकाशन व्यवहार आणि संपादन यांची ओळख करून देणे. |
| · ग्रंथनिर्मितीप्रक्रिया समजावून देणे. | ||||
| · संहिता संपादन समजावून देणे. | ||||
| · प्रकाशन संस्था व जाहिरात यांचे व्यवहारिक जीवनातील उपयोजन स्पष्ट करणे. | ||||
| 13. | SYBA | III | मराठी भाषिक संज्ञापन कौशल्ये 23011 MIL | · भाषा व व्यक्तिमत्त्व विकास यांची ओळख करून देणे. |
| · प्रसारमाध्यमांसाठी आवश्यक संज्ञापन कौशल्ये समजून देणे. | ||||
| · मुद्रित शोधनाची संकल्पना समजून सांगणे. | ||||
| · मराठी भाषिक संज्ञापन कौशल्यांचे व्यवहारिक जीवनात उपयोजन करणे. | ||||
| 14. | SYBA | IV | भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य
24023 – G2 |
· ललित गद्य गद्य, या साहित्य प्रकाराचे स्वरूप घटक प्रकार आणि वाटचाल समजून देणे. |
| · नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील ललितगद्याचे आस्वाद आणि आकलन करणे. | ||||
| · गुगल साधनांचा अध्ययन व व्यावहारिक जीवनात प्रभावीपणे वापर करणे. | ||||
| · साहित्यरंग या पुस्तकाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणे. | ||||
| 15. | SYBA | IV | मध्ययुगीन मराठी साहित्य: निवडक मध्ययुगीन गद्य, पद्य 24021 – S1 | · मध्ययुगीन गद्य-पद्य साहित्यप्रकारांची ओळख करून देणे. |
| · नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील मध्ययुगीन गद्य पद्य साहित्याचा आस्वाद आणि आकलन करणे. | ||||
| · मध्ययुगीन कालखंडातील प्रेरणा व प्रवृत्तींचा अभ्यास करणे. | ||||
| · मध्ययुगीन कालखंडातील साहित्याचे व भाषेचे विश्लेषण करणे. | ||||
| 16. | SYBA | IV | साहित्य समीक्षा 24024 – S2 | · साहित्य समीक्षेची संकल्पना, स्वरूप यांचा परिचय करून देणे. |
| · साहित्य आणि समीक्षा यांचे परस्पर संबंध समजावून देणे. | ||||
| · साहित्य प्रकारानुसार समीक्षेचे स्वरूप समजावून देणे. | ||||
| · विविध समीक्षा पद्धतीच्या आधारे विद्यार्थी मध्ये समीक्षात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. | ||||
| 17. | SYBA | IV | उपयोजित लेखन कौशल्ये
24025 – SEC |
· जाहिरात, मुलाखतलेखन आणि संपादन यांचा अभ्यास करणे. |
| · दृकश्राव्य माध्यमासाठी मुलाखत कौशल्याची ओळख करून देणे. | ||||
| · माहितीपर नोंदींची ओळख करून देणे. | ||||
| · जाहिरात, मुलाखत लेखन आणि संपादन या उपयोजित कौशल्याचे दैनंदिन व्यवहारात उपयोजन करणे. | ||||
| 18. | SYBA | IV | नवसमाजमाध्यमे आणि समाज माध्यमांसाठी मराठी
24011 – MIL |
· भाषा व जीवन व्यवहार यांचा सहसंबंध समजून देणे. |
| · नवसमाजमाध्यमांविषयी जागरूकता निर्माण करणे. | ||||
| · व्यावसायिक पत्रव्यवहाराची ओळख करून देणे. | ||||
| · समाजमाध्यमांचे महत्त्व आणि परिणामाचे विश्लेषण करणे | ||||
| 19. | TYBA | V | भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : प्रवासवर्णन
35023 – G3 |
· मुद्रितमाध्यमांसाठी लेखन कौशल्यआत्मसात करणे. |
| · प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, प्रयोजन आणि वैशिष्ट्ये समजून देणे. | ||||
| · तीन मुलांचे चार दिवस या पुस्तकाचे आधुनिक काळातील महत्त्व समजून सांगणे. | ||||
| · तीन मुलांचे चार दिवस या प्रवासवर्णनाचे आकलन, आस्वाद, आकलन आणि विश्लेषण करणे. | ||||
| 20. | TYBA | V | मराठी वाड्मयाचा स्थूल इतिहास प्रारंभ ते इ.स. १६००
35021 – S3 |
· साहित्य इतिहासाची संकल्पना, स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती समजावून सांगणे. |
| · मध्ययुगीन कालखंडाची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून देणे. | ||||
| · मराठी भाषा साहित्याची कालखंडानुसार विभागणी करणे व इतिहास समजून देणे. | ||||
| · मध्ययुगीन कालखंडातील विविध साहित्यप्रकारांचा अभ्यास व विश्लेषण करणे. | ||||
| 21. | TYBA | V | वर्णनात्मक भाषाविज्ञान
35022 – S4 |
· मराठी साहित्य, कौशल्य विकास आणि शासन व्यवहार यांची ओळख करून देणे. |
| · राज्यघटनेतील भाषा विषयक तरतुदीचा परिचय करून देणे. | ||||
| · रूप कवितेचे या नेमलेल्या अभ्यास पुस्तकातील निवडक कवितांचे आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन करणे. | ||||
| · मराठी कवितेच्या प्रेरणा, प्रवृत्ती, स्वरूप व वाटचाल समजून देणे. | ||||
| 22. | TYBA | V | कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये 35025 – SEC | · कार्यक्रमाचे स्वरूप व प्रकार समजून सांगणे. |
| · कार्यक्रमसंयोजनातील भाषिक कौशल्ये अवगत करणे. | ||||
| · कार्यक्रम नियोजन, सूत्रसंचालन यांची कौशल्ये प्राप्त करणे. | ||||
| · आयोजक, प्रायोजक, जाहिरातदार, निवेदक यांचे कार्य व महत्त्व समजून सांगणे. | ||||
| 23. | TYBA | VI | मराठी भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : कविता
36023 – G3 |
· मराठी साहित्य, कौशल्य विकास आणि शासन व्यवहारयांची ओळख करून देणे. |
| · राज्यघटनेतील भाषा विषयक तरतुदीचा परिचय करून देणे. | ||||
| · रूप कवितेचे या नेमलेल्या अभ्यास पुस्तकातील निवडक कवितांचे आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन करणे. | ||||
| · मराठी कवितेच्या प्रेरणा, प्रवृत्ती, स्वरूप व वाटचाल समजून देणे. | ||||
| 24. | TYBA | VI | मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा स्थूल इतिहास इ.स. १६०१ ते १८१७ 36021 – S3 | · शिवकाल आणि पेशवेकालातील वाड्मयीन प्रेरणा, प्रवृत्ती, स्वरूप समजून देणे. |
| · संत तुकाराम, रामदास, अनंत फंदी, मोरोपंत, रामजोशी, प्रभाकर इ. संत, पंडित व शाहिर कवींचे मराठी साहित्यातील योगदान अभ्यासणे. | ||||
| · बखर वाड्मय प्रेरणा, प्रवृत्ती, स्वरूप समजून देणे. | ||||
| · सभासद बखर, शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र, भाऊसाहेबांची बखर पानिपत बखर आज्ञापत्र अभ्यासणे व विश्लेषण करणे. | ||||
| 25. | TYBA | VI | वर्णनात्मक भाषाविज्ञान 36022 – S4 | · रुपविन्यास आणि मराठीची रूप व्यवस्था समजावून घेणे. |
| · वाक्यविन्यास आणि मराठी भाषे संदर्भात वाक्यव्यवस्थेचा परिचय करून देणे. | ||||
| · अर्थविन्यास या संकल्पनेचा भाषाविज्ञानाच्या अंगाने परिचय करून देणे. | ||||
| · क्षेत्रभेट व संशोधन प्रकल्प यांचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष क्षेत्र भेट. | ||||
| 26. | TYBA | VI | कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये 36025 – SEC | · विषयाशी अनिवार्य कार्यक्रम संयोजनातील लेखन कौशल्ये समजावून सांगणे. |
| · आभासी कार्यक्रम संयोजनाचा परिचय करून देणे. | ||||
| · निमंत्रणपत्रिका, मानपत्र लेखन, अहवाल लेखन इ. कौशल्ये समजावून सांगणे. | ||||
| · कविसमेलन, मराठी भाषादिन. पुस्तकप्र दर्शन इ. कार्यक्रमांचे यशस्वी संयोजन करणे. | ||||
| 27. | SY
BSc. |
III | उपयोजित मराठी – 83111 | · मराठी भाषा आणि जीवन व्यवहार यांची ओळख करून देणे. |
| · प्रसारमाध्यमातील विविध लेखनप्रकारांचा अभ्यास वा प्रत्यक्षलेखन अभिरुचीचा विकास करणे. | ||||
| · नवसमाजमाध्यमे व प्रशासकीय लेखन यामधील विविध संधीची माहिती देणे. | ||||
| · जागतिकीकरणात विविध क्षेत्रांना सामोरे जाण्यासाठी भाषिक क्षमता विकसित करणे. | ||||
| 28. | SY
BSc. |
IV | मराठी कथा दर्शन – 83112 | · साहित्य विषयक अभिरुची विकसित करणे. |
| · साहित्य विषयक अभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे. | ||||
| · विज्ञान साहित्य विषयक आकलन क्षमता वाढवणे. | ||||
| · निवडक विज्ञान कथांचा आस्वाद घेऊन त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता विकसित करणे. | ||||
| NEP – 2023 – 24 Pattern – MA – I & II ( Sem- I, II, III, IV ) | ||||
| 29. | MA I 2023 Patt. | I | अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (इ.स. १८१८ ते १९२०) – MAR 501 MJ | · वाङ्मयेतिहासाच्या स्वरूपाचा विद्यार्थ्यांना परिचय होईल. |
| · अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती, स्वरूप यांचे विवेचन करता येईल. | ||||
| · इ.स. १८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्याचे स्वरूप विशद करता येईल. | ||||
| · इ.स. १८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती यांचे विश्लेषण करता येईल. | ||||
| · इ.स. १८१८ते१९२०या कालखंडातील साहित्याची कारण मीमांसा करता येईल. | ||||
| · इ.स. १८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्या निर्मितीच्या प्रेरणा, प्रवृत्ती लक्षात येऊन विद्यार्थ्यांना साहित्यनिर्मिती आणि विश्लेषण करता येईल. | ||||
| 30. | MA I 2023 Patt. | I | ऐतिहासिक भाषाविज्ञान – MAR 502 MJ | · ऐतिहासिक भाषाविज्ञानाचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट करता येईल. |
| · ऐतिहासिक भाषाविज्ञानाचे सिद्धांत महत्त्व आणि मर्यादा विशद करता येतील. | ||||
| · ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या ज्ञानातून स्थानिक भाषांचा अभ्यास करता येईल. सिद्धांत महत्त्व आणि मर्यादा विशद करता येतील. | ||||
| · जागतिक व भारतीय भाषांचे अध्ययनाच्या दृष्टीकोनातून वर्गीकरण करता येईल. | ||||
| · जागतिक व भारतीय भाषांचा तौलनिक अभ्यास करता येईल. | ||||
| · विविध भारतीय भाषा आणि बोली भाषांवर आधारित प्रकल्प तयार करता येतील. | ||||
| 31. | MA I 2023 Patt. | I | प्रशासनिक लेखन कौशल्ये – MAR 503 MJ | · कार्यालयीन लेखन पद्धतीची कौशल्य विकसित होतील. |
| · दैनदिन जीवन आणि रोजगार यासाठी सदर कौशल्याचे उपयोजन करता येईल. | ||||
| · विद्यार्थ्यानमध्ये भाषिक कौशल्ये विकसित होतील. | ||||
| · विद्यार्थ्याना कार्यालयीन लेखन पद्धतीच्या कौशल्याची ओळख होईल. | ||||
| · विद्यार्थ्यांना प्रमाण भाषा आणि कार्यालयीन भाषेचे स्वरूप अवगत झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. | ||||
| · कार्यालयीन लेखन पद्धतीची कौशल्य विकसित होतील. | ||||
| 32. | MA I 2023 Patt. | I | प्रशासनिक लेखन कौशल्ये – MAR 503 MJP | · कार्यालयीन लेखनासंदर्भातील ज्ञान विकसित होईल. |
| · कार्यालयीन लेखन पद्धतीची कौशल्य विकसित होतील. | ||||
| · दैनदिन जीवन आणि रोजगार या साठी सदर कौशल्याचे उपयोजन करता येईल. | ||||
| · विद्यार्थ्यांनामध्ये भाषिक कौशल्ये विकसित होतील. | ||||
| · विद्यार्थ्याना कार्यालयीन लेखन पद्धतीच्या कौशल्याची ओळख होईल. | ||||
| · विद्यार्थ्यांना प्रमाणभाषा आणि कार्यालयीन भाषेचे स्वरूप अवगत झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. | ||||
| 33. | MA I 2023 Patt. | I | प्रकाशन व्यवहार आणि ग्रंथ प्रक्रिया – MAR 504 MJP | · प्रकाशन व्यवहारआणि ग्रंथ प्रक्रिया यांचे स्वरूप सांगता येईल. |
| · प्रकाशन व्यवहारा साठी आवश्यक कौशल्ये प्राप्त होतील. | ||||
| · ग्रंथनिर्मिती, ग्रंथाचे सम्पादन आणि प्रकाशन करता येईल. | ||||
| · प्रकाशन व्यवहार आणि ग्रंथनिर्मिती प्रक्रिया यासाठी आवश्यक कौशल्ये अंगीकरता येतील. | ||||
| · प्रकाशन व्यवहा आणि ग्रंथनिर्मिती प्रक्रिया संबंधीत कौशल्यांचा परिस्थितीनुरूप वापर करता येईल. | ||||
| · ग्रंथनिर्मिती प्रक्रियेमध्ये नाविन्यपूर्णता आणता येईल. | ||||
| 34. | MA I 2023 Patt. | I | साहित्यप्रवाहांचा अभ्यास : दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य – MAR 510 MJ | · साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहाविषयीज्ञानप्राप्तहोईल. |
| · साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहांचा उगम आणि विकास स्पष्ट होईल. | ||||
| · साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याच्या तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये वर्गीकरण क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित होईल. | ||||
| · याप्रवाहामध्ये लेखनकरण्याचे कौशल्ये व त्याअनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्षमता विकसित होईल. | ||||
| 35. | MA I 2023 Patt. | I | साहित्य प्रवाहांचा अभ्यास: दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य MAR 510 MJ P | · साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाहा विषयी ज्ञान प्राप्त होईल. |
| · साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहांचा उगम आणि विकास स्पष्ट होईल. | ||||
| · साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याच्या तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये वर्गीकरण क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित होईल. | ||||
| · याप्रवाहामध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व त्याअनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्षमता विकसित होईल. | ||||
| 36. | MA I 2023 Patt. | I | संशोधन पद्धती – MAR 541 MN | · संशोधनाचे स्वरूप कळण्यास मदत होईल. |
| · संशोधनाच्या विविध पद्धती समजतील. | ||||
| · प्रत्यक्ष संशोधन करताना वरील अभ्यासाचा आधार घेता येईल. | ||||
| · संशोधनाच्या विविध अभ्यास क्षेत्रांची माहिती होईल. | ||||
| · संशोधनाचा आराखडा तयार करता येईल. संशोधनास पूरक पुरावे गोळा करता येतील. | ||||
| · संशोधनदृष्टी विकसित होईल तसेच चिकित्सक दृष्टी विकसित होईल. | ||||
| 37. | MA I 2023 Patt. | II | अर्वाचीन मराठी वाड्मयाचा इतिहास (इ.स. 1920 ते 2010) – MAR 551 MJ | · इ.स. १९२० ते २०१० या कालखंडातील वाड्मयेतिहासाच्या स्वरूपाचा विद्यार्थ्यांना परिचय होईल. |
| · अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती, स्वरूपयांचे विवेचन करता येईल. | ||||
| · इ.स. १९२० ते २०१० या कालखंडातील साहित्याचे स्वरूप विशद करता येईल. | ||||
| · इ.स. १९२० ते २०१० या कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा प्रवृत्ती यांचे विश्लेषण करता येईल. | ||||
| · इ.स. १९२० ते २०१० या कालखंडातील साहित्याची कारणमीमांसा करता येईल. | ||||
| · इ.स. १९२० ते २०१० या कालखंडातील साहित्यानिर्मितीच्या प्रेरणा, प्रवृत्ती लक्षात येऊन विद्यार्थ्यांना साहित्य निर्मिती आणि विश्लेषण करता येईल. | ||||
| 38. | MA I 2023 Patt. | II | समाजभाषाविज्ञान – MAR 552 MJ | · समाजभाषा विज्ञानाचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट करता येईल. |
| · समाजभाषा विज्ञानाची व्याप्ती, स्वरूप, सिद्धांत, महत्त्व व मर्यादा विशद करता येतील. | ||||
| · समाजभाषा विज्ञानाच्या ज्ञानातून स्थानिक भाषांचा अभ्यास करता येईल. | ||||
| · भारतीय भाषांचे समाजभाषाविज्ञानाच्या अध्ययनाच्या दृष्टीकोनातून वर्गीकरण करता येईल. | ||||
| · स्त्रिया, पुरुष, मुले, युवक व वृद्धाच्या भाषेचे मूल्यमापन करता येईल. | ||||
| · विविध भारतीय भाषा व बोली भाषावर आधारित प्रकल्प तयार करता येतील. | ||||
| 39. | MA I 2023 Patt. | II | प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये – MAR 553 MJ | · प्रसारमाध्यमासाठी लेखन कौशल्याचा परिचय होईल. |
| · मराठीचे प्रसारमाध्यमांसाठी लेखन याक्षेत्रातील उपयोजन ज्ञात होईल. | ||||
| · विविध माध्यामासाठी उपयुक्त लेखन तंत्र अवगत होईल. त्याचे उपयोजन करता येईल. | ||||
| · विविध माध्यामातील आकृतिबंधाचे स्वरूप अवगत होईल. | ||||
| · विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांसाठी लेखनया क्षेत्राचा परिचय होईल. | ||||
| · विद्यार्थी प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये आत्मसात करतील. | ||||
| 40. | MA I 2023 Patt. | II | प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्ये – MAR 553 MJP | · प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्यांचा परिचय होईल. |
| · मराठीचे प्रसारमाध्यमांसाठी लेखन या क्षेत्रातील उपयोजन ज्ञात होईल. | ||||
| · विविध माध्यमांसाठी उपयुक्त लेखनतंत्र अवगत होईल. त्याचे उपयोजन करता येईल. | ||||
| · विविध माध्यमांतील आकृतिबंधाचे स्वरूप अवगत होईल. | ||||
| · विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांसाठी लेखन या क्षेत्राचा परिचय होईल. | ||||
| · विद्यार्थी प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये आत्मसात करतील. | ||||
| 41. | MA I 2023 Patt. | II | नियतकालिकांचे स्वरूप आणि संपादन – MAR 554 MJP | · नियतकालिकांचे स्वरूप आणि संपादन यांची माहिती होईल |
| · नियतकालिकांच्या संपादनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये प्राप्त होतील. | ||||
| · नियतकालिकांचे संपादन करता येईल. | ||||
| · नियतकालिकांच्या संपादनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये अंगीकारता येतील. | ||||
| · नियतकालिकांच्या संपादन प्रक्रियेत आवश्यक कौशल्याचा परिस्थितीनुरूप वापर करता येईल. | ||||
| · नियतकालिकांच्या संपादन प्रक्रियेत नाविन्यपूर्णता आणता येईल. | ||||
| 42. | MA I 2023 Patt. | II | साहित्य प्रवाहांचा अभ्यास: आदिवासी साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य – MAR 560 MJ | · साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहाविषयी ज्ञान प्राप्त होईल. |
| · साठोत्तरी वाडमयीन प्रवाहांचा उगम आणि विकास स्पष्ट होईल. | ||||
| · साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याच्या तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये वर्गीकरण क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित होईल. | ||||
| · या प्रवाहामध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व त्या अनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्षमता विकसित होईल. | ||||
| 43. | MA I 2023 Patt. | II | साहित्य प्रवाहांचा अभ्यास: आदिवासी साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य – MAR 560 MJP | · साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहाविषयी ज्ञान प्राप्त होईल. |
| · साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहांचा उगम आणि विकास स्पष्ट होईल. | ||||
| · साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याच्या तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये वर्गीकरणक्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित होईल. | ||||
| · याप्रवाहामध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व त्या अनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्षमता विकसित होईल. | ||||
| 44. | MA I 2023 Patt. | II | व्यावसायिक प्रशिक्षण – MAR 560 MJ | · प्रकाशन संस्थेची कार्य प्रक्रिया माहिती होईल. |
| · छपाईतंत्र प्रक्रिया माहिती होईल. | ||||
| · बांधणी तंत्राची माहिती होईल. | ||||
| · साहित्य संस्थांचे कार्य प्रत्यक्ष अनुभवता येईल. | ||||
| · विविध प्रसारमाध्यामामध्ये रोजगार क्षमता विकसित होईल. | ||||
| · ग्रंथ विक्रीची माहिती व त्याअनुषंगाने रोजगार क्षमता विकसित होईल. | ||||
| 45. | MA I 2023 Patt. | II | व्यावसायिक प्रशिक्षण / क्षेत्रभेट – MAR 560 MJP – OJT | · प्रकाशन संस्थेची कार्य प्रक्रिया माहिती होईल. |
| · छपाई तंत्र प्रक्रिया माहिती होईल. | ||||
| · साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याच्या तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये वर्गीकरण क्षमता विकसित होईल. | ||||
| · साहित्यकृतींचे साठोत्तरी वाड्मयीन प्रवाहामध्ये मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित होईल. | ||||
| · याप्रवाहामध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व त्याअनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्षमता विकसित होईल. | ||||
| 46. | MA II 2024 Patt. | III | MAR601MJ मध्ययुगीन कालखंडातील साहित्यकृतींचा अभ्यास [4T] | · मध्ययुगीन साहित्य व साहित्याचे प्रकार सांगता येतील. |
| · मध्ययुगीन साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन साहित्याच्या प्रेरणा विशद करता येतील. | ||||
| · मध्ययुगीन साहित्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर आधारित प्रकल्पलेखन करता येईल. | ||||
| 47. | MA II 2024 Patt. | III | MAR602MJ साहित्य समीक्षा : संकल्पना, स्वरूप आणि समीक्षापद्धती | · साहित्य समीक्षेचे स्वरूप सांगता येईल. |
| · साहित्य समीक्षेतील विविध सिद्धांत, संकल्पना आणि समीक्षापद्धती आदींच्या परिचयासह त्यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येतील. | ||||
| · सैद्धांतिक समीक्षेतील विविध व्यूहांसह तिची उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास करता येईल. | ||||
| · साहित्य समीक्षेतील विविध संकल्पना, सिद्धांताच्या आकलनाअंती विविध साहित्यप्रकार-साहित्यकृतींचे अध्ययनाच्या दृष्टीकोनातून वर्गीकरण करून अभ्यास करता येईल. | ||||
| · जागतिक व भारतीय समीक्षापद्धती यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल. | ||||
| · विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सैद्धांतिक सामिक्षेविषयी आधारित प्रकल्प तसेच उपयोजित समीक्षालेखन करता येईल. | ||||
| 48. | MA II 2024 Patt. | III | MAR603MJ सौंदर्यशास्त्र [2T] | · सौंदर्यशास्त्राचे स्वरूप सांगता येईल. |
| · सौंदर्यशास्त्रातील विविध सिद्धांत, संकल्पना यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येतील. | ||||
| · सौंदर्यशास्त्रातील विविध व्यूहांसह तिची उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास करता येईल. | ||||
| · सौंदर्यशास्त्रातील विविध संकल्पना, सिद्धांताच्या आकलनाअंती विविध साहित्यप्रकार-साहित्यकृतींचे अध्ययनाच्या दृष्टीकोनातून वर्गीकरण करणे शक्य होईल. | ||||
| · जागतिक व भारतीय सौंदर्यशास्त्राचा परिचय होईल. | ||||
| · विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सौंदर्यशास्त्रावर आधारित प्रकल्प तयार करता येतील. | ||||
| 49. | MA II 2024 Patt. | III | MAR604MJP साहित्य समीक्षा आणि समीक्षापद्धती प्रात्यक्षिक [4P] | · उपयोजित समीक्षेचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट होतील. |
| · साहित्यातील विविध सिद्धांत आणि संकल्पना आदींच्या परिचयासह त्यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट होतील. | ||||
| · उपयोजित समीक्षेची वैशिष्ट्ये, विविध सिद्धांतांच्या आधारे आंतरविद्याशाखीय ज्ञान प्राप्त होईल. | ||||
| · उपयोजित समीक्षेचे विविध सिद्धांत आणि संकल्पना यांच्या परस्परसंबंधाच्या आकलनाअंती विविध साहित्यप्रकार-साहित्यकृतींचे अध्ययनाच्या दृष्टीकोनातून उपयोजन तथा वर्गीकरण करणे शक्य होईल. | ||||
| · उपयोजित समीक्षेबद्दल जागतिक व भारतीय साहित्याच्या अभ्यासकांनी मांडलेल्या भूमिकांविषयी अभ्यास होईल. | ||||
| · उपयोजित समीक्षा कशी केली जाते यावर आधारित प्रकल्प तयार करता येईल. | ||||
| 50. | MA II 2024 Patt. | III | MAR610MJ
E-1 साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास [2T] |
· सामाजिक संकल्पना स्पष्ट करता येईल. |
| · साहित्याचे महत्त्व व मर्यादा विशद करता येतील. | ||||
| · सामाजिक दृष्टीकोनातून साहित्याचा अभ्यास करता येईल. | ||||
| · सामाजिक अध्ययनाच्या दृष्टीकोनातून साहित्याचे वर्गीकरण करता येईल. | ||||
| · साहित्य व समाज यांचा तौलनिक अभ्यास करता येईल. | ||||
| · विविध सामाजिक साहित्यकृतींवर आधारित प्रकल्प तयार करता येतील. | ||||
| 51. | MA II 2024 Patt. | III | MAR611MJPE-1 साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास : प्रात्यक्षिक [2P] | · सामाजिक संकल्पना स्पष्ट करता येईल. |
| · साहित्याचे महत्त्व व मर्यादा विशद करता येतील. | ||||
| · सामाजिक दृष्टीकोनातून साहित्याचा अभ्यास करता येईल. | ||||
| · सामाजिक अध्ययनाच्या दृष्टीकोनातून साहित्याचे वर्गीकरण करता येईल. | ||||
| · सामाजिक अध्ययनाच्या दृष्टीकोनातून साहित्याचे वर्गीकरण करता येईल. | ||||
| · विविध सामाजिक साहित्यकृतींवर आधारित प्रकल्प तयार करता येतील. | ||||
| 52. | MA II 2024 Patt. | III | MAR631RP संशोधन प्रकल्प | · संशोधन प्रकल्पाचे स्वरूप, प्रयोजने, आवश्यकता सांगता येतील. |
| · संशोधन प्रकल्पलेखनाची तंत्रे व साधने स्पष्ट करता येतील. | ||||
| · संशोधन प्रकल्पलेखनात ग्रंथालयांतील साधनांचा वापर करता येईल. | ||||
| · संशोधन प्रकल्पाचा विषय आणि प्रकल्पलेखनामागील उद्दिष्टे निश्चित करता येतील. | ||||
| · संशोधन प्रकल्पाच्या विषयानुरूप लेखनशैली, भाषाशैली यांचा वापर करता येईल. | ||||
| · मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याविषयी संशोधन प्रकल्पलेखन करता येईल. | ||||
| 53. | MA II 2024 Patt. | IV | Major Core
MAR651MJ अर्वाचीन कालखंडातील साहित्यकृतींचा अभ्यास [4T] |
· अर्वाचीन साहित्य व साहित्याचे प्रकार सांगता येतील. |
| · अर्वाचीन साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येईल. | ||||
| · अर्वाचीन साहित्यकृतींचा अभ्यास करता येईल. | ||||
| · अर्वाचीन साहित्याच्या प्रेरणा विशद करता येतील. | ||||
| · अर्वाचीन साहित्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल. | ||||
| · अर्वाचीन साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर आधारित प्रकल्पलेखन करता येईल. | ||||
| 54. | MA II 2024 Patt. | IV | MAR652MJ लोकसाहित्याची मूलतत्त्वे आणि मराठी लोकसाहित्य [4T] | · लोकसाहित्याचे स्वरूप सांगता येईल. |
| · लोकसाहित्याचा विविध घटकांशी असलेला अनुबंध स्पष्ट करता येईल. | ||||
| · मराठी लोकसाहित्याचे अध्ययन करता येईल. | ||||
| · मराठी लोकसाहित्याच्या विविध कलाविष्कारांचे वर्गीकरण करता येईल. | ||||
| · मराठी लोकसाहित्याच्या कलात्मक सौंदर्याचे मूल्यमापन करता येईल. | ||||
| · मराठी लोकसाहित्याच्या संकलनास आणि अभ्यासास प्रोत्साहन मिळेल. | ||||
| 55. | MA II 2024 Patt. | IV | MAR654MJP सर्जनशील लेखन : स्वरूप आणि प्रकार [4P] | · सर्जनप्रक्रियेचे स्वरूप ज्ञात होईल. |
| · सर्जनप्रक्रियेतील घटकांचा परिचय होईल. | ||||
| · साहित्याच्या निर्मितीतील प्रतिभेचे कार्य लक्षात येईल. | ||||
| · साहित्याच्या अभिव्यक्तीपद्धतीनुसार पडणाऱ्या साहित्यप्रकारांचा परिचय होईल. | ||||
| · साहित्याच्या अभिव्यक्तीपद्धतीनुसार पडणाऱ्या साहित्यप्रकारांचे अवलोकन करता येईल. | ||||
| · साहित्यलेखनाला प्रोत्साहन मिळेल. | ||||
| 56. | MA II 2024 Patt. | IV | MAR660MJ
E-1 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी [2T] |
· वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगता येईल. |
| · मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी विशद करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास करताना या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आधार घेता येईल. | ||||
| · मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या आधारे विश्लेषण करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन समाजाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर वाङ्मयाचे मूल्यमापन करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन वाङ्मयप्रकारांचे अध्ययन केल्यानंतर त्या वाङ्मयप्रकारांमध्ये निर्मिती करू शकेल. | ||||
| 57. | MA II 2024 Patt. | IV | MAR661MJPE-1 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी : प्रात्यक्षिक [2P] | · वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगता येईल. |
| · मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी विशद करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास करताना या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आधार घेता येईल. | ||||
| · मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या आधारे विश्लेषण करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन समाजाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर वाङ्मयाचे मूल्यमापन करता येईल. | ||||
| · मध्ययुगीन वाङ्मयप्रकारांचे अध्ययन केल्यानंतर त्या वाङ्मयप्रकारांमध्ये निर्मिती करू शकेल. | ||||
| 58. | MA II 2024 Patt. | IV | MAR681RP संशोधन प्रकल्प | · संशोधन प्रकल्पाचे स्वरूप, प्रयोजने, आवश्यकता सांगता येतील. |
| · संशोधन प्रकल्पलेखनाची तंत्रे व साधने स्पष्ट करता येतील. | ||||
| · संशोधन प्रकल्पलेखनात ग्रंथालयांतील साधनांचा वापर करता येईल. | ||||
| · संशोधन प्रकल्पाचा विषय आणि प्रकल्पलेखनामागील उद्दिष्टे निश्चित करता येतील. | ||||
| · संशोधन प्रकल्पाच्या विषयानुरूप लेखनशैली, भाषाशैली यांचा वापर करता येईल. | ||||
| · मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याविषयी संशोधन प्रकल्पलेखन करता येईल. | ||||